breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘तो नियोजित कट’, जेएनयुतील भ्याड हल्ल्याचा शरद पवारांकडून निषेध’

नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. तर, देशभरातून समाजवादी आणि पुरोगामी नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

शरद पवार यांनी ट्विट करुन जेएनयुमधील हल्ला हा लोकशाहीविरोधी असून या हिंसक घटनेचा मी निषेध करतो. जेएनयुमधील विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा नियोजित कट असल्याचं पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. हिंसेचा वापर करणे म्हणजे लोकशाही मुल्यांचा आणि विचारांचा खून करण्यासारखे आहे, जे कधीही यशस्वी होणार नाही, असेही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button