breaking-newsपुणे

नोकरदारांनो लक्ष द्या; पॅन-आधार न दिल्यास दंड!

पुणे |महाईन्यूज|

तुमचा पॅन क्रमांक किंवा आधार क्रमांक अद्याप तुमच्या कंपनीतील वित्तविभागाला दिला नसल्यास त्वरित द्या, अन्यथा चालू आर्थिक वर्षअखेर तुम्हाला २० टक्के किंवा त्याहून अधिक प्राप्तिकराचा भुर्दंड बसेल. पॅन किंवा आधार क्रमांक न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या उत्पन्नावर २० टक्के दराने किंवा त्यापेक्षा अधिक दराने प्राप्तिकर कापा, अशा सूचना प्रत्यक्ष करमंडळाने देशातील सर्व कंपन्यांना दिल्या आहेत. प्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट गाठताना करविभागाची दमछाक होत असतानाच हे परिपत्रक जारी झाल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यासंदर्भात सीए संजीव गोखले यांनी सांगितले की, पूर्वी केवळ पॅन क्रमांक द्यावा लागत असे. त्यावेळी पॅन क्रमांक देण्याची सक्ती करताना तो न देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून अशा प्रकारे अधिक कर कापण्याच्या सूचना कर मंडळाने दिल्या होत्या. यावर्षी पॅन किंवा आधार क्रमांक न दिल्यास असा अधिक प्राप्तिकर कापला जाणार आहे.

याविषयीचे परिपत्रक प्रत्यक्ष करमंडळाने नुकतेच जारी केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी पॅन किंवा आधार क्रमांक देताना तो योग्य प्रकारे द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनपत्रकात टीडीएस कापलेली रक्कम दाखवलेली असते. पॅन किंवा आधार क्रमांक कंपनीला किंवा मालकाला त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कापलेल्या टीडीएसच्या पत्रकात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कायदा असे सांगतो
प्राप्तिकर कायद्यानुसार, नियमित वेतन कमावणाऱ्या व्यक्तीने तिच्या कंपनीला पॅन क्रमांक देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास त्याच्या करपात्र उत्पन्नावर कायद्यातील तरतुदींनुसार किंवा २० टक्के यापैकी जो दर अधिक असेल त्या दराने कर कापून घेणे संबंधित कंपनीला बंधनकारक आहे. याविषयीचे ताजे परिपत्रक गेल्याच आठवड्यात देशभरातील कंपन्यांसाठी जारी करण्यात आले. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न अडीच लाख करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असेल तर उगमकर किंवा डीटीएस कापण्याची गरज नाही. जर २० टक्के दराने टीडीएस कापण्यात येणार असेल तर ४ टक्के आरोग्य व शिक्षण उपकर वेगळा कापण्याची आवश्यकता नाही.

कंपन्यांनी घ्याव्यात ‘या’ दक्षता

  • करविषयक चलान, टीडीएस प्रमाणपत्र, पत्रके किंवा अन्य कागदपत्रे भरताना ‘टॅक्स डिडक्शन अॅण्ड कलेक्शन अकाऊंट’ (टॅन) क्रमांक टाकणे गरजेचे आहे.
  • टॅन क्रमांक न टाकल्यास १० हजार रुपये दंड आकारणी होणार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button