breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नुकसानग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज : उध्दव ठाकरे

मुंबई – एकीकडे संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढाई लढत असताना महाराष्ट्रावर अतिवृष्टीसारखे दुहेरी संकट कोसळले आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडले. आणि आता परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उभे पिक पाण्यात गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहता यावं याकरता राज्य सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हातातून निघून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी आता अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्णपणे कोसळला. मात्र, याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा उभं राहावं याकरता राज्य सरकारने १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. येत्या दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ नये याकरता राज्य सरकारने तातडीची मदत जाहीर केले आहे. तसेच, हे पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस केंद्राने दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण केले नसून राज्याच्या हक्काचे ३८ हजार कोटी अद्यापही केंद्राकडून आले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

१० हजार कोटींचे पॅकेज कसे असणार?

  • पूर, अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर
  • रस्ते आणि पुलासांठी २ हजार ३६५ कोटी
  • नगरविकास ३०० कोटी, जलसंपदा १०२ कोटींची तरतूद
  • महावितरण ऊर्जा २३९ कोटींची तरतूद
  • ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठ्यासाठी १ हजार कोटी देणार
  • नुकसानग्रस्त कृषी आणि घरांसाठी ५ हजार ५०० कोटींची तरतूद
  • जिरायत, बागायतसाठी १० हजार प्रतिहेक्टर देणार
  • दिवाळीपर्यंत प्रत्येक आपत्तीग्रस्ताला मदत पोहोचणार
  • मृतांच्या वारसांनाही मदत पोहोचणार
  • फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये देणार (२ हेक्टरी पर्यंत)
  • केंद्राकडून 38 हजार कोटी रुपये येणं बाकी
    एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंं. “केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईकरता 1065 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारकडून राज्याचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याची पत्रे, स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत. अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारकडून पाहणीकरिता  पथक येते, 2 ते 3 वेळा केंद्रास आठवण केली आहे परंतु अद्याप पथक आलं नाही,” असं ठाकरे म्हणाले.केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक आहे, कोणताही दुजाभाव न करता त्यांनी मदत करावी. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ते करतील असा विश्वास आहे. यासाठी गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेण्यासही मी तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button