breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी विधानसभेसाठी शेखर ओव्हाळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी विधासभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून शेखर ओव्हाळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित मेश्राम, छायाताई कोतवाड, संदीप ढेरंगे, नीलेश अल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी ‘शेखर ओव्हाळ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘एकच भाऊ, शेखरभाऊ’ अशा घोषणा दिल्या. ठिकठिकाणी महिलांनी ओव्हाळ यांचे औक्षण केले. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी (दि. 4) शेवट मुदत होती. त्यामुळे सकाळपासूनच पिंपरी विधानसभा मतदार संघात जल्लोषाचे वातावरण होते. राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या शेखर ओव्हाळ यांना उमेदवारीबाबत डावलण्यात आल्यामुळे ते दुखावले गेले होते.

मात्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचाच हे ध्येय असल्यामुळे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवायची, असा निर्धार शेखर ओव्हाळ यांनी केला. कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शेखर ओव्हाळ यांना पूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच माघार न घेता स्वबळावर ही निवडणूक लढवायची असा त्यांनी निश्चय केला आणि त्यानुसार शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत ओव्हाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. 

????????????????????????????????????
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button