breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पेरू देश भूकंपाने हादरला! रस्त्यांना भेगा, घरांना तडे

लिमा – दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला पेरू देश रविवारी पहाटे भूकंपाने हादरला. पहाटे ५.५२ वाजता ७.५ रिष्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामूळे तेथील अनेक घरांना तडे गेले असून रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यात अमेझॉन प्रांतातील पुरातन चर्चचा काही भाग कोसळल्याची माहिती महापौर वॉल्टर कलकुई यांनी दिली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू बेरंका शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर आणि ११२ किलोमीटर जमिनीखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. हा भूकंप राजधानी लिमासह इतर शहरातही जाणवला. त्यामुळे लोक घराबाहेर पळाले होते. ऍमेझॉन आणि कजामार्का प्रांतातील काही इमारती कोसळल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. पेरूचे राष्ट्रपती पेड्रो कैस्टीलो यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ऍमेझॉनसह अन्य प्रांतातील भूकंपबाधित लोकांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. दरम्यान, भूकंप परिस्थितीवेळी नागरिकांनी जिथे असाल तिथे गुडघ्यावर बसून हात खाली ठेवावेत. तसेच या स्थितीत तुम्ही उभे राहून पुढे सरकू शकता, असे आवाहन सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशनने केले आहे. पेरू देशात अशा प्रकारचे भूकंप सातत्याने घडत असतात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button