breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’ला मिळतेय तुफान लोकप्रियता,3 दिवसांत मिळाले इतके लाख व्ह्यूज

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेली समांतर ही वेब सीरिज नुकतीचं प्रदर्शित झाली. या सीरिजला सध्या तुफान लोकप्रियता मिळत असून आतापर्यंत ही सीरिज लाखो लोकांनी पाहिली आहे. या सीरिजमध्ये स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली असून तेजस्विनी पंडीतने स्क्रीन शेअर केली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे दिग्दर्शित ही सीरिज सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित आहे. विशेष म्हणजे ओव्हर-द-टॉप आणि ‘एमएक्स प्लेयर’वर प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.“समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला ‘समांतर’ करायला मिळते आहे. असं स्वप्नीलने त्याच मत व्यक्त केल आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button