breaking-newsराष्ट्रिय

निवडणूक आयोगावर पंतप्रधानांचा दबाव : सुरजेवाला

कोलकाता- काँगेसचे जेष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. याचबरोबर भाजपा आयटी सेल प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या आधीच निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याचा पुरावा देत त्यांनी भाजपा हाच ‘निवडणूक आयोगाची’ भूमिका बजावत असल्याचे देखील म्हंटले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आज निवडणूक आयोगाद्वारे पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ही पत्रकार परिषद निवोजीत वेळेवर होऊ शकली नाही.

Randeep Singh Surjewala

@rssurjewala

Dear ECI,

1.National BJP IT Cell Head tweeted election dates of Knt. even before ECI

2.ECI delinked Gujarat elections from Himachal to enable PM Modi to make a slew of announcements.

3.ECI again deferred PC to enable PM Modi to do the same in Rajasthan

Is BJP the ‘Super EC’?

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची अचानक बदलेली वेळ आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून  काँग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याप्रकरणावर आक्षेप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच सदर पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ट्विटर द्वारे आपली भूमिका मांडताना सुरजेवाल यांनी म्हंटले आहे आहे की “निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १२.३० ला होणार होती, तसेच पंतप्रधानांची सभा आज अजमेर येथे १ वाजता होती त्यामुळेच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचा वेळ अचानक बदलून दुपारी ३ वाजताची केली.

Randeep Singh Surjewala

@rssurjewala

3 Facts- Draw your own conclusions.

1. ECI announces a PC at 12.30 today to announce elction dates to the 5 states.

2. PM Modi is addressing a rally in Ajmer, Rajasthan at 1 PM today.

3. ECI suddenly changes the time of announcement and PC to 3 PM.

Independence of ECI?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button