breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गणेशोत्सवामुळे मध्य भागातील वाहतुकीत आजपासून बदल

गौरी विसर्जनानंतर मध्य भागातील विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन सोमवारपासून (१७ सप्टेंबर) लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या प्रमुख मार्गावरील वाहतुकीत सायंकाळनंतर बदल करण्यात येणार आहेत. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बंद ठेवण्यात येईल किंवा पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.

मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान बदल करण्यात येणार आहेत. बंद राहणारे रस्ते तसेच पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- डुल्या मारुती चौक, दारुवाला पूल, खडीचे मैदान चौक, सिंचन भवन, शाहीर अमर शेख चौक, कुंभार वेस चौक, महापालिका भवन किंवा हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता, घोरपडे पेठ पोलीस चौकी, शंकरशेठ रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ चौक ते जेधे चौक), पर्यायी मार्ग- सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजीबाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता, घोरपडे पेठ चौकी, झगडे आळी ते शंकरशेठ रस्ता किंवा काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक, झाशी राणी चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), पर्यायी मार्ग- पूरम चौक, टिळक रस्ता, उजवीकडे वळून केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक. टिळक रस्ता-  (मराठा चेंबर ते हिराबाग चौक ), पर्यायी मार्ग- नेहरू स्टेडिअम, जमनालाल बजाज पुतळा चौक, उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबाग. मध्य भागातील अन्य बंद रस्ते पुढीलप्रमाणे- सिंहगड गॅरेज चौक (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), जोशी आळी हिराबाग चौक, जगदीश गॅरेज उपरस्ता, गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, गंजपेठ चौकी ते वीर लहूजी वस्ताद तालीम चौक, गावकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौकी (लष्कर), जेधे प्रसाद रस्ता (सुभानशहा रस्ता, पाश्र्वनाथ चौक, शास्त्री चौक, सोन्या मारुती चौक), गुरू नानक पथ ते हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक .

गणेशोत्सवाच्या कालावधीत सायंकाळी सहा ते गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद चौक रस्ता, सिंहगड गॅरेज ते नाईक रस्ता, कोहिनूर हॉटेल ते महावीर चौक या मार्गावरील एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात आले आहेत.

वाहने लावण्यास मनाई

शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्वर चौक, उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक उजवीकडे सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर दुतर्फा सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गौरी विसर्जन ते गणपती विसर्जनापर्यंत मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button