breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,95,381 वर

  • मुंबईत 1,600, पुण्यात 817 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. रविवारी आढळलेल्या 9 हजार 060 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 95 हजार 381 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 150 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 42 हजार 115 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 11 हजार 204 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 69 हजार 810 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 82 हजार 973 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 1 हजार 600 नवे रुग्ण आढळले, तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 41 हजार 935 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 785 इतका झाला आहे. तसेच काल 2 हजार 714 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2 लाख 10 हजार 813 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 817 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 14 हजार 462 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 449 इतका झाला आहे. तसेच काल जिल्ह्यात 698 इतक्या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, आता पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 57 हजार 417 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 85 हजार 518 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button