breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जळगाव येथील अत्याचार प्रकरणी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार – आमदार गौतम चाबुकस्वार

पिंपरी – जळगाव येथे नुकत्याच घडलेल्या मातंग समाजातील युवकांना विहिरीत पोहल्याने झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज सोमवारी (दि. 18) येथे केली.

अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सर्वपक्षीय व सर्व दलित संघटनांच्या वतीने जळगाव येथील मातंग समाजातील मुलांवर झालेल्या अमाणुष अत्याचार प्रश्नी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षदा नरेश करासिया या आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, झुंबर शिंदे, नगरसेवक उत्तम हिरवे, अरूण टाक, काँग्रेस मावळ लोकसभा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, धुराजी शिंदे, बबन साके, मनोज तोरडमल, दशरथ कसबे, युवराज दाखले, भगवान शिंदे, नाना कसबे, राजु आवळे, राजन नायर, सुनिल भिसे, बापु वाघमारे, विठ्ठल कळसे, दिपक चकाले, तानाजी साठे, अविनाश कांबेकर, विशाल कसबे, अण्णा कसबे, पांडुरंग लोखंडे, महेंद्र सोनवले, गणेश अडागळे, भाळासाहेब खंदारे, निता वाल्मिकी, संदिप जाधव, सतिश भवाळ, श्रावण बगाडे, रेशमा पारधे, तुकाराम उदगीरे, वाल्मिकी समाज अध्यक्ष राजु परदेशी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button