breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ना हिंदू संकटात ना मुस्लिम; संकटात तर संविधान आहे : जितेंद्र आव्हाड

पुणे |महाईन्यूज|

नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमचे धन्यवाद. कारण तुमच्यामुळे देशातील हिंदू मुस्लिम एकत्र येऊ लागले आहेत. ही लढाई फक्त हिंदु किंवा फक्त मुस्लिमांची अशी उरलेली नाही. तूम्ही दगडी मारा, पण त्या दगडांचा आम्ही ताजमहाल करू आणि त्यातच तुमची कबर बांधू. सध्याच्या परिस्थितीत देशात ना हिंदू खतरेंमे ना मुस्लिम खतरेंमे है यहाँ खतरेंमे तो संविधान है अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

पुण्यात ‘संविधान बचाओ’ आणि सीएए व एनआरसी विरोधी सभेचे आयोजन सारसबाग येथे करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार जिग्नेश मेवाणी, आदी मान्यवर उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले, देशात हिंदू- मुस्लिम दरी करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.नथूराम म्हणजे पहिला अतिरेकी. महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो गांधी हत्येचा हा दिवस मूस्लिम तुष्टीकरणाच्या विरोधात त्यांची हत्या झालेली नाही तर बहुजन समाजाला सगळे दरवाजे खुले होत आहे त्या रागातून ती झाली, यावर माझा विश्वास आहे. तसेच आझादीच्या वेळेस नारा होता वंदे मातरम, आज सगळ्यांचा नारा जय भीम आहे. एनआरसी सीएए हा संविधानावरचा हल्ला आहे. बंच ऑफ थॉटस मधले आहे सगळे आत्ता सुरू आहे ते. संघात तेच शिकवतात. दुय्यम नागरिकत्व, तिरंगा पापी, चारवर्ण बरोबर हे सगळे त्या बंच ऑफ थॉटस ” मध्ये आहे.

जेएनयूला का घाबरतात हे? कारण तिथे गरीब विद्यार्थी आहेत. कन्हैय्याचे घर बघितले मी, मित्र आहे माझा, घरात फिरायला जागा नाही त्याच्या आणि तो आज दिल्लीत देशाचा आवाज झालाय.
मोठेमोठे नेते जे करू शकत नाहीत ते देशाच्या विद्यापीठांमधील विद्यार्थी करत आहेत.झाडांवर चढून ते बोलतात आणि झाडासारखे मोठे लोक शांत आहेत. काही विचारायला आले तर संविधान दाखवा आणि हीच आमची ओळख हीच असे ठणकावून सांगा. मुस्लिम म्हटला की अतिरेकी व दलित म्हटले की नक्षल असा प्रकार सुरू आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button