breaking-news

ट्रेलरवर क्रूझर धडकली; चार भाविकांचा जागीच मृत्यू

करमाड | महाईन्यूज

इगतपुरीहून जालन्याच्या दिशेने जाणारी एक क्रूझर जीप रस्त्यावर उभ्या ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाल्याची घटना रात्री 2.40 च्या दरम्यान गाढेजळगाव शिवारात घडली. क्रूझरमधील प्रवासी इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजाकडे परतत असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाविक इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री सर्व भाविक क्रूझर गााडीने परतत होते. दरम्यान करमाडजवळ गाढेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे (दि. 31) 2.40 वाजेच्या सुमारास भरधाव क्रुजर (MH28 AN 3620) रोडच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरवर (MH40BJ8111) मागच्या बाजूने धडकली आहे. या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले.तसेेेच पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत. अपघातातील मृत व जखमी हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button