breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, डिसेंबरपासून 365 दिवस 24 तास RTGS सेवा; शुल्क आणि नियम काय?

नवी दिल्ली | आरबीआयनं आज एक मोठी घोषणा केली असून, 2020 डिसेंबरपासून 24 तास 365 दिवस RTGS सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच इन्स्टंटद्वारे पैसे हस्तांतरित करणंही सहजसोपं होणार आहे. आठवड्याच्या सात दिवसांतील 24 तासांत कोठेही, कधीही पैसे पाठवणं आता शक्य होणार आहे. ऑनलाइन बँकिंग निधी हस्तांतरणाची आरटीजीएस सेवा 24 तास 365 दिवस वापरता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं केली आहे.

आरबीआयकडून ऑनलाईन मनी ट्रान्सफर-आरटीजीएस सुविधा 24 तास सुरू केली जाणार आहे. आरटीजीएस सुविधा डिसेंबर 2020पासून 24×365 उपलब्ध असेल. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाऊ शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने ऑक्टोबरच्या पतधोरणामध्ये RTGS 24 तास सुरू करण्याची घोषणा केली आहे. एका बँकेतून दुसर्‍या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचे बरेच पर्याय आहेत. त्यापैकी सर्वात लोकप्रिय RTGS, NEFT आणि IMPS आहेत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये NEFTची सेवादेखील 24 तास सुरू करण्यात आली होती.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2020पासून RTGS सेवा 24 तास उपलब्ध असेल. 24x7x365 तत्त्वावर रिअल टाइम पेमेंट सिस्टमवर मोठ्या प्रमाणात व्यवहार उपलब्ध करून देणार्‍या काही देशांच्या यादीमध्ये भारताचादेखील समावेश झाला आहे. या टप्प्यात मोठ्या मोबदल्याच्या पेमेंट इको-सिस्टममध्ये नवनिर्मितीला चालना मिळेल आणि व्यवसाय करण्यास सोयीस्कर ठरेल. सध्या आरटीजीएस सेवा सुट्टीच्या दिवशी वापरता येत नाही, परंतु ती डिसेंबरपासून उपलब्ध होईल. किमान दोन लाख रुपयांचे व्यवहार आरटीजीएसद्वारे करता येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button