breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेश

इमर्जिंग आशिया चषक : भारत-पाकिस्तान आज हाय व्होल्टेज सामना

कोलंबो । इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये रविवारी ‘भारत अ’ संघ ‘पाकिस्तान अ’ संघाशी भिडणार आहे.यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताचा वरचष्मा दिसतोय.साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता.दोन्ही संघांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळेल.

आशिया चषक सुरु होण्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 सप्टेंबरला 2023 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.मात्र याआधीही भारत-पाकिस्तान यांच्यातील जबरदस्त लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशचा 51 धावांनी पराभव करत 211 धावांचा बचाव केला.भारतीय फिरकी गोलंदाज निशांत सिंधू (5/20) आणि मानव सुथार (3/32) यांनी प्रभावी कामगिरी केली यश धुलने 66 धावांची खेळी केली होती.

त्याचवेळी पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा चार विकेट राखून पराभव केला.दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यूएईचा 184 धावांनी पराभव केला.तिसऱ्या सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पुनरागमन करताना पाकिस्तानने उपांत्य फेरीत श्रीलंका-अ संघाचा 60 धावांनी पराभव केला.आता अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

पाकिस्तान-अ संघात आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू
पाकिस्तानच्या संघात वरिष्ठ स्तरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या काही खेळाडूंचा समावेश आहे.कर्णधार मोहम्मद हरिसने गेल्या वर्षी पाकिस्तानकडून टी-20 विश्वचषक खेळला आहे.याशिवाय सॅम अयुब,तैयब ताहिर,मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहनवाज डहानी यांचा समावेश आहे.वसीम आणि डहानी हे गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात होते.त्याच वेळी,’भारत-अ’ मध्ये समाविष्ट असलेल्या एकाही खेळाडूने आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नाही.सुदर्शन,अभिषेक आणि रियान पराग वगळता बाकीच्यांना आयपीएलचा फारसा अनुभव नाही.

भारत-अ संघ
साई सुदर्शन,अभिषेक शर्मा,निकिन जोस,यश धूल (कप्तान),रियान पराग,निशांत सिंधू,ध्रुव जुरेल (विकेटकीपर),मानव सुथार,हर्षित राणा,नीतीश रेड्डी, आरएस हंगरगेकर,आकाश सिंह,प्रदोष पॉल,प्रभसिमरन सिंह,युवराजसिंह डोडिया

पाकिस्तान-अ संघ
सैम अयूब, तैय्यब ताहिर, मोहम्मद हारिस (विकेटकीपर/कप्तान),कामरान गुलाम,साहिबजादा फरहान,ओमैर यूसुफ,कासिम अकरम,मोहम्मद वसीम जूनियर,अरशद इकबाल,शाहनवाज दहानी,सुफियान मुकीम,हसीबुल्लाह खान,मुबासिर खान,अमद बट,मेहरान मुमताज

इमर्जिंग आशिया कपचा अंतिम सामना कोठे खेळला जाईल?
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.

अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.

सामना कुठे पाहू शकता?
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल.त्याच वेळी,तुम्ही हा सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकता.

हवामान स्थिती
रविवारी कोलंबोमध्ये तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. अंशतः ढगाळ, पण पाऊस नाही. दुपारी कडक सूर्यप्रकाश येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button