breaking-newsपिंपरी / चिंचवड

नागरिकांनी पर्यावरणपूरक पध्दतीने घरीच गणेश विसर्जन करावे – नगरसेवक उत्तम केंदळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका प्रशासनाने गणेश विसर्जन घरीच करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सर्व विसर्जन घाट व कुंड बंद असणार या कारणामुळे भाजप प्रभाग १३ व भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने माझा प्रभाग माझी जबाबदारी उपक्रम अंतर्गत अनोख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका कमल घोलप तसेच प्रभागातील भाजप पदाधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. उत्तम केंदळे म्हणाले की, या उपक्रमात सध्या होत असलेल्या गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जनासाठी पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करावे. विसर्जन करण्यासाठी अमोनियम बाय कार्बोनेट पावडर वाटप करण्यात येत आहे. पावडर 10-12 लिटर पाण्यात टाकून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करावे.

मूर्ती विरघळल्यावर त्यातील पाणी झाडांना टाकावे व लगदा खत म्हणून झाडांना वापरावा. तसेच दुसरा उपक्रम हा गणेश विसर्जन कुंड आपल्या दारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी कोणत्याही एका उपक्रमाचा लाभ घेऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button