breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

1,820 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी, संपूर्ण मुंबईतून परवानगीसाठी आले होते 2,350 अर्ज

मुंबईत आज, शनिवारपासून गणेशोत्सवाचा सोहळा साजरा केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाची छाया पडली असली तरीही घरगुती आणि सार्वजनिक मंडळे उत्साहाने गणरायाच्या सेवेत मग्न आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत १,८२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आतापर्यंत परवानगी दिली आहे. तर संपूर्ण मुंबईतून परवानगीसाठी आलेल्या अर्जांची संख्या २,३५० एवढी आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेकडे पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेकडून ऑनलाइन परवानगीची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी पालिकेकडे शुक्रवारी दुपारपर्यंत आलेल्या २,३५० अर्जांपैकी २५६ अर्ज नामंजूर ठरविण्यात आले आहे. तर, २७४ अर्जांवर विविध टप्प्यांवर छाननी प्रक्रिया सुरू आहे. अर्ज नाकारल्या गेलेल्या मंडळांकडून परवानगीसाठी जोडाव्या लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी पालिकेकडून विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा समावेश आहे. मुंबईकरांना यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन यापूर्वीच पालिकेतर्फे केले आहे. तसेच, घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी मूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत वा ड्रममध्‍ये करण्याची सूचना केली आहे.

मुंबईत एकूण ७० नैसर्गिक विसर्जनस्‍थळे असून तिथे थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास गणेशभक्तांना प्रतिबंध आहे. नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर पालिकेकडून अतिरिक्‍त मनुष्‍यबळ पुरविण्यात आले असून तिथे मूर्ती संकलनाची व्‍यवस्‍था आहे. पालिकेच्या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७० कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे केली आहेत. त्यावर कृत्रिम तलावांची माहिती पत्ता, गुगल लोकेशनसह पालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in वर उपलब्‍ध आहे. तसेच, पालिकेने फिरती विसर्जन स्‍थळांचीही सुविधा पुरविली असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button