breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनाची लक्षणे आढळल्यास ‘वायसीएम’शी संपर्क साधावा – आयुक्त

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सध्या शहरात कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून योग्य उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) आयसोलेशन वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता, वायसीएम रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी नागरिकांना केले.

देशभरात कोरोना व्हायरसबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने कोणते पाऊल उचलले आहे. याची माहिती घेण्यासाठी आणि खबरदारीच्या सूचना करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांची आयुक्तांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी हे देखील उपस्थित होते. दोन्ही आमदारांनी खबरदारी म्हणून प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या. वायसीएम रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षांसंदर्भात माहिती घेतली.

त्यानंतर महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांनी वायसीएम रुग्णालयात कोरोना व्हायरससंदर्भात केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बावडे, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. निरंजन पाठक आदी होते. 

डॉ. राजेंद्र वाबडे म्हणाले की, वायसीएम रुग्णालयात कोरोना व्हायरससंदर्भात उपाययोजना म्हणून आयसोलिशन वार्ड तयार आहे. यामध्ये 8 बेडची व्यवस्था असून 4 महिला आणि 4 पुरुष बेड आहेत. शहरात जनजागृतीसाठी 165 ठिकाणी माहिती फलक, दिड लाख माहिती पत्रकांचे वाटप सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये एन.95 ट्रीप्पल लेयर मास्क मुबलक प्रमाणात आहेत. 

नागरिकांनी प्राथमिक काळजी म्हणून हस्तांदोलन टाळावे, शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा. काळजी घेतल्यास घाबरण्याचे कारण नाही.

डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button