ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या १३ दिवसांत ११ वेळा इंधनदरवाढ झाली असून आतापर्यंत ८ रुपयांनी दर वाढले आहेत. आजही मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर वाढत असल्याने भारतात इंधनाचे दर वाढत आहेत. मागील आठवड्यापासून सतत दरवाढ सुरू आहे. भारतीय कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत इंधनदरात ८४ पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार आज मुंबईत पेट्रोल ११८. ४१ रुपये आणि डिझेल १०२. ६४ रुपये प्रति लीटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत इंधन दर ८० पैशांनी वाढले असून पेट्रोल १०३. ४१ रुपये प्रति लीटर तर, डिझेल ९४. ६७ रुपये प्रति लीटर झाले आहे.

चेन्नईत आज इंधन दरात ७५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळं पेट्रोल १०८. ९६ रुपये आणि डिझेल ९९. ०४ रुपये लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दरात ८४ पेशांची वाढ झाली असून पेट्रोल ११३. ०३ रुपये लिटर पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर, डिझेल ९७.८२ रुपये प्रति लीटर झाले आहे.

इंधनदरवाढी विरोधात आंदोलन

मागील आठ दिवसांत वारंवार इंधन दरवाढ करण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, किराणा माल, कडधान्ये, गॅसच्या जीवनावश्यक सर्व वस्तूंची भाववाढ होत आहे. महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेला गिळंकृत करीत आहे. भाववाढ थांबविण्याच्या मागणीसाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन पुकारलं आहे.काल काँग्रेसने राज्यभरातील विविध जिल्ह्यात केंद्र सरकारविरोधात आंदोलन के

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button