breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: “…लगेच सेलिब्रेशन सुरु करु नका”, नरेंद्र मोदींनी खडसावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनाला आज देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. करोनाविरोधात लढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदी आज रात्री ९ वाजता संपत असली तरी लगेच सेलिब्रेशन करण्यास सुरुवात करु नका असं सांगत खडसावलं आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही एका मोठ्या लढाईची सुरुवात असल्याचं सांगितलं आहे. “हा धन्यवाद नाद आहे. पण ही एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे. हाच संकल्प करत आपण मोठ्या लढाईसाठी सोशल डिन्सन्सिंगच्या बंधनात अडकून घेऊयात”. आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले.

“केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशांचं नक्की पालन करा. ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे तिथे लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. याशिवाय इतर ठिकाणीही गरज नसेल तर घराबाहेर पडू नका,” असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “आजची जनता संचारबंदी रात्री ९ वाजता संपत असली तरी आपण लगेच सेलिब्रेशन सुरु करावं असा त्याचा अर्थ नाही. हे आपलं यश आहे असं समजू नका. ही एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे. आज देशवासियांनी आपण ठरवलं तर मोठ्या आव्हानाला एकत्र सामोरं जाऊ शकतो हे दाखवून दिलं आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button