breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या स्थानिक गरजांसाठी ‘आरोग्य योजना’ बनविणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेच्या सांगवी येथील नटसम्राट निळु फुले रंगमंदिरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महिला आरोग्य समिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणास अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.संध्या भोईर, वैद्यकिय अधिकारी डॉ.अंजली ढोणे, डॉ.श्रीकांत सुपेकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.बिपिन डिंबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सदर प्रशिक्षणास राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्थापन करणेत आलेल्या महिला आरोग्य समिती अध्यक्ष,सचिव,सदस्य,पी.एच.एन., ए.एन.एम. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महिला आरोग्य समिती ही स्थानिक महिलांची सामुहिक समिती आहे. महिला आरोग्य समितीने आरोग्य, पोषण, पाण्याची शुध्दता व स्वच्छता हया बाबत झोपडपटृटी स्तरावर समन्वय करण्यासाठी महिला आरोग्य समितीचा उपयोग केला जातो. महिला आरोग्य समितीकडे “स्थानिक समुदयाची कृती ” चे केद्रस्थान म्हणुन पाहिले जात आहे. महिला आरोग्य समिती टप्प्याटप्प्याने आरोग्य नियोजनाच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभागी होण्याकरीता महिला आरोग्य समिती विशिष्ट स्थानिक गरजांकरिता “आरोग्य योजना ” तयार करणे आणि आरोग्यासाठी समुदायास कृती करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणुन भुमिका बजावत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी केले. सुत्रसंचालन महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी केले. तर डॉ. श्रीकांत सुपेकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button