पिंपरी / चिंचवड

गांजा ओढल्या प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 24) दुपारी काळेवाडी येथे केली.

सचिन सीताराम चौधरी (वय 21, रा. तापकीर मळा चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस नाईक दादा रमेश धस (वय 34) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी हा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथील पवना नदीच्या किनारी गणपती मंदिराच्या पाठीमागील बाजूला आडोशाला गांजा पीत बसला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून 100 रुपये किमतीचा सहा ग्रॅम गांजा व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button