breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबईतील बाधितांची संख्या पावणेचार हजारांवर

मुंबईत बुधवारी १८२ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकूण रुग्णसंख्या पावणेचार हजारांवर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे १७ जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी दिवसभरात करोनाबाधितांमध्ये १८२ जणांची भर पडली. तर १७ ते १९ एप्रिल या काळात खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी केलेल्या १२७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे बुधवारी जारी झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवारी करोनाबाधितांची एकूण संख्या ३,७५४ वर पोहोचली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button