राष्ट्रिय

नागरिकांच्या मानगुटीवर पेट्रोल, डिझेलची दरवाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असून पुन्हा एकदा दर वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरामध्ये झालेल्या वाढीचा भार देशातील इंधनावर पडला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

 

आज राजधानी दिल्लीसह इतर शहरात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 16 पैसे तर डिझेलमध्ये 22 पैसे वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच डिझेलचे दर 70 रूपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे आज दिल्लीमध्ये पेट्रोल 78.68 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 70.42 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मागील एका महिन्यापासून आजपर्यंत दिल्लीमध्ये पेट्रोल 2.43 रूपये प्रति लिटर तर डिझेल 2.68 रूपये प्रति लिटरने महाग झाले आहे.

 

तर महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर  86.09 रूपये तर डिझेलचा दर 74.76 रूपये इतका झाला आहे. महाराष्ट्रातील पिंपरीचिंचवड शहरात आज पेट्रोलचा दर 86.02 रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 73.50 रूपये प्रति लिटर असा आहे.

 

तसेच इतर प्रमुख शहरात कोलकत्तामध्ये पेट्रोल प्रति लिटर  81.60 रूपये आणि डिझेल प्रति लिटर 73.27 रूपये असे आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.75 तर डिझेलचा दर  प्रति लिटर 74.41 रूपयांवर पोहचले आहे..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button