breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या तक्रारीचे वेळेत निराकरण करा – महापाैर राहूल जाधव यांच्या प्रशासनला सुचना

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सन्मानाने वागणूक देवून त्यांनी  ‘सारथी’ सह विविध माध्यमातून केलेल्या तक्रारीचे वेळेत निराकरण करायला हवे, अशा सुचना महापाैर राहूल जाधव यांनी महापालिका प्रशासनला दिल्या. 

महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी  ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसेविका साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्यलेखापाल राजेश लांडे, मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जाधव हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,  गणेश उत्सवामध्ये गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी. ड्रेनेज व पावसाळी गटारांचे प्रश्न उदभवू नये याची दक्षता घ्यावी.  विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण समवेत संबधित अधिका-यांनी बैठक घेऊन धोकादायक डीपीबाबत उपाययोजना कराव्यात. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. शहरातील आरोग्य विषयक दक्षता घेण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती औषध फवारणी करून डेंग्यू सारख्या आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उपाय योजना कराव्यात.

तसेच शहरातील कचरा दररोज गोळा करण्यात यावा. हॉकर्स झोनचा प्रश्न लवकर मार्गी लावावा. पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. मोकाट, उपद्रवी पाण्यांचा बंदोबस्त करण्यात यावे, असा विविध प्रश्नाबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला सुचना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button