breaking-newsपिंपरी / चिंचवड

संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले.

पालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सहभागी झाले होते. गोकूळ हॉटेलसमोर पालखीचे स्वागत करण्यात आले. पिंपरीगाव येथे सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाले. समर्थ रंगावलीतर्फे पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. संजोग वाघेरे, उषा वाघेरे उपस्थित होते. पिंपरीगावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पालखी मुक्कामी पोचली. तेथे आरती झाली. बुधवारी (ता.८) सकाळी सात वाजता पालखी चिंचवड-आकुर्डीमार्गे देहूसाठी मार्गस्थ होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button