breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत – यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु

मुंबई – भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादीत स्वरूपात सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणांवरून उड्डाणे होतील.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,05,788 वर

कोविड प्रकरणात आणखी एक संसर्गजन्य कोरोनाचा विषाणूचा कारणीभूत ठरल्यामुळे नवी दिल्लीने यूकेकडे जाणारी उड्डाणे बंद केली होती. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी जाहीर केले की, भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान प्रवासी उड्डाणे 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होतील. या उड्डाणे फक्त नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून चालवल्या जातील, असेही मंत्री म्हणाले. भारत आणि ब्रिटन दरम्यान विमान सेवा 8 जानेवारी 2021पासून पुन्हा उड्डाण सुरू होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ब्रिटनहून मुंबईत आलेल्या पॉझिटिव्ह प्रवाशांची संख्या 27 वर पोहोचली आहे. यापैकी 10 प्रवासी निगेटिव्ह रिपोर्ट्स आले आहेत. प्रवासी निगेटिव्ह आले तरी त्यांचे अहवाल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

वाचा :-दिल्लीमधील हार्ले डेव्हिडसन्सच्या शोरूममध्ये भीषण आग

त्यांचा अहवाल अद्याप आला नसल्याने या 27 प्रवाशांना सेव्हन हिल रुग्णालयातच विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. 25 नोव्हेंबरपासून मुंबईत आलेली प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान मुंबईत २६४० प्रवासी आले. 2640 पैकी 1450 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. उर्वरित 1190 प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button