breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कंगना रनोटवर शिवसेना प्रवक्ते भडकले, म्हणाले – कंगनाची स्प्लिस्ट पर्सनॅलिटी, तिला डॉक्टरांची गरज

मुंबई| बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावले आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने योग्य वाटत असेल तिथे राहावे. तिने आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोललेले आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाने आपले बस्तान उचलावे हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे.

पुढे अनिल परब म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फक्त कंगनालाच का भेटावे, मुंबईत इतरही गरीबांची अनधिकृत बांधकामं पडत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या गरीबांनाही भेटले पाहिजे, अशा टोला देखील त्यांनी लगावला.

‘कंगना रनोट स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असं म्हणतात. तिला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, डॉक्टर नाही भेटले तर शिवसेना मदत करेल. शिवसेना कंगनाला काही बंदी घालणार नाही ती महत्वाची नाही. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या’, असेदेखील अनिल परब म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button