breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात ‘Reebok’चे हक्क आता आदित्य बिर्ला ग्रुपकडे

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल ग्रुपने रीबॉक या सुप्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडचे भारतासह आग्नेय आशियातील वितरण आणि उत्पादन हक्क दीर्घकाळासाठी विकत घेतले आहेत. कंपनीने यासंबंधी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

कंपनीने म्हटलंय, ‘या करारामुळे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल ग्रुपची आशियात प्रचंड वेगाने पुढे जात अससेल्या क्रीडा विभाग एंट्री होईल. मागील काही वर्षात लोकांची वाढती कमाई, निरोगी आरोग्याबाबत जागरूकता आणि युवा भारतीयांची ऍक्टिव्ह लाइफस्टाईल यामुळे क्रीडा विभागात प्रचंड प्रगती सुरू आहे.’ दरम्यान, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल त्यांच्या सॉली, लुइस फिलिप, पीटर इंग्लंड, पेंटालून्स आणि वैनहुसैन यांसारख्या पोशाखांसाठी ओळखले जाते. कंपनीने पूर्वेकडील विविध फॅशन सेगमेंटमधील कित्येक ब्रँड विकत घेतले आहेत. याच वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने ख्यातनाम डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांचा वधूसाठीच्या पोशाखांसाठी असलेल्या खास ब्रँडमधील ५१ टक्के भाग विकत घेतला. तर फेब्रुवारी महिन्यात तरुण तहिलियानी यांच्या पुरुषांसाठीच्या इथिनिक वियर लेबल हाऊसचा ३३ टक्के भाग विकत घेऊन त्यांच्यासोबत भागीदारी केली.

तर आता रीबॉकसोबतच्या कराराबाबत आदित्य बिर्ला ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आशिष दीक्षित म्हणाले, ‘जसजसे भारतीय क्रीडासह आरोग्यावर लक्ष देत आहेत, तसतसा त्यासंबंधी उत्पादनांचा खप वाढत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठित ब्रँड उभारण्याची सध्या संधी मिळत आहे. रीबॉक हा क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावरील लिडिंग ब्रँड असून त्याने मागील दोन दशकात भारतीय बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे. आम्ही भारतात रीबॉकचा व्यवसाय वाढविण्याची योजना तयार करत आहोत. या कराराने रीबॉकचा व्यवसाय अधिक मजबूत होईल आणि विविध ग्राहकांशी जोडण्याची आमची क्षमता वाढेल’, असे त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button