breaking-news

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 2032 वर

नागपुर : आज दिवसभरात नागपुर शहरात ११२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज पहिल्यांदाच नागपूरात १२ तासात शंभरपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ११२ पैकी १०० रुग्णांमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आणि कैद्यांचा समावेश आहे. नागपूरात रॅपिड अँटीजेन टेस्टिंगला सुरवात झाली आहे, ज्यामध्ये १०० रुग्ण हे कारागृहातील पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

इतर १२ रुग्ण आज पॉझिटिव्ह आलेले आहेत, ते शहरातील विविध भागांमधील आहे, आज ११२ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजारांची संख्या पार करून २०३२ इतकी झाली आहे. तर आज १४ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४१२ इतकी झाली आहे. नागपूरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button