breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
मुंबई – मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे. लातूर आणि नांदेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. तर परभणीला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, मराठवाडा, पश्चिम विदर्भात पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे.
कोकणमध्येही पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई या ठिकाणी आकाश ढगाळले राहिले. तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस पडत आहे. तर कोकणमधील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.