breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नांदगाव शहरासह तालुक्यात गारपीटसह अवकाळी पावसाचा तडाखा

मनमाड | नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर परिसरासह तालुक्यातील काही भागात शुक्रवारी गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

खळ्यात, मळ्यात उघडयावर असलेला कांदा भिजून खराब झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले होते.

वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.आमगाव तालुक्यातील अवकाळी संध्याकाळी 6 वाजता पासून जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार पावसा सहवादळ वारे व गारांचा पाऊस झाला, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांत दहशत निर्माण झाली होती. अचानक हवामानात बदल झाल्याने पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button