breaking-newsआंतरराष्टीय

नवीन वर्ष हे पाकिस्तानच्या सुवर्णयुगाची सुरुवात- खान

गरिबी, निरक्षरता, अन्याय आणि भ्रष्टाचार याविरुद्ध जिहाद पुकारण्याचा निर्धार पाकिस्तानने केला असल्याने नव्या वर्षांत देशाच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशातील जनतेला नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गरिबी, निरक्षरता, अन्याय आणि भ्रष्टाचार याविरुद्ध जिहाद पुकारण्यात आला आहे, हा नव्या वर्षांचा ठराव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ४.८६ रुपयांनी कमी केले आहेत तर डिझेलचे दर प्रति लिटर ४.२६ रुपयांनी कमी केले आहेत. नव्या पाकिस्तानची निर्मिती करण्याचे ध्येय समोर ठेवून खान यांचे सरकार सत्तेवर आले, मात्र जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांना संघर्षच करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button