breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयमुंबई

नवीन कोरोना व्हायरस; रिंकू राजगुरू, संतोष जुवेकर, प्रियांकासह इतर सेलिब्रिटी युकेमध्येच

नव्या कोरोना व्हायरच्या प्रकारामुळं इंग्लंडमध्ये संकट ओढावलेलं आहे. तेथे पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात येत आहे. तसेच अनेक देशांनी इंग्लंडहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. या सक्तीच्या लॉकडाऊनमुळं अनेक बडे सेलिब्रिटी तिथं अडकल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटी परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे.

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला माहिती दिली. याबाबत दहशतीचं वातावरण असतानाच आता कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारमुळं या दहशतीत भर पडली आहे.

वाचाः राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्यावेळी कलाविश्वातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होतं. पण, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. अनेक कलाकार पुन्हा चित्रीकरणांमध्ये व्यग्र झाले. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, आफताब आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनच्या या कचाट्यात सापडलेल्या सेलिब्रिटींसमवेत त्यांच्या चित्रपटातील क्र्यू मेंबर्सही असल्याचं कळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button