breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमच्या हक्काच्या घराचे काय ?

कासारवाडीतील हिराबाई लांडगे झोपडपट्टीधारकांचा सवाल

नगरसेविका आशा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आंदोलन

पिंपरी | प्रतिनिधी

कासारवाडीतील हिराबाई लांडगे झोपडपट्टीधारकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर आंदोलन केले. हक्काच्या घरासाठी व विविध मागण्यांसाठी नगरसेविका आशा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या पायरीवर ठिय्या आंदोलन केले. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नगरसेविका आशा शेंडगे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून झोपडपट्टी सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत २४७ झोपडपट्टीची नोंद करण्यात आली. कासारवाडीतील हिराबाई लांडगे झोपडपट्टीची देखील नोंद करण्यात आली होती. १९७० रोजी या झोपडपट्टीला अधिकृत घोषित करण्यात आले. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे (एसआरए) अंतिम पात्रता यादीत केवळ १३१ झोपडपट्टीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ११६ झोपडपट्टीचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. या झोपडपट्टीधारकांमध्ये संभ्रमाचे, भीतीचे वातावरण आहे. हक्काचे छप्पर कोण देणार ? रेल्वेपासून संरक्षण कोण करणार असा प्रश्न या झोपडपट्टीधारकांना पडला आहे. तसेच पुढील मागण्या झोपडपट्टीधारकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केल्या.

निवेदनात नमूद केले की,  हिराबाई लांडगे झोपडपट्टीतील पात्र झोपडपट्टीधारकास फोटोपास देणे. प्रत्येक झोपडपट्टीधारकास वैयक्तिक नावाने फोटोपास द्यावा. या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी शिबीर घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना पत्र करावे. झोपड्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे (एसआरए) पात्र लाभार्थ्यास आहे त्याच ठिकाणी घर बांधून देणे बंधनकारक आहे. या झोपडपट्टीधारकांना भोसरी, कासारवाडी येथे महापालिकेच्या सांस्कृतिक भवनसाठी ५ गुंठे आरक्षण आहे. त्याच जागेवर या ११६ झोपडपट्टीतील लोकांना घरे विकसित करून द्यावीत, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button