breaking-newsराष्ट्रिय

नवविवाहितेवर नातेवाईकांकडूनच सामूहिक बलात्कार

कुरूक्षेत्र – नवविवाहितेवर पती, दिर आणि चार तांत्रिकांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार हरियाणातील कुरूक्षेत्र येथे घडला. पिडित नवविवाहितेचे 12 सप्टेंबरला लग्न झाले आणि 13 सप्टेंबरला लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले.

या प्रकरणी पीडित महिलेने तिचा पती, दिर, पतीच्या बहिणीचा नवरा, सासरे, सासू, नणंद आणि एका मांत्रिकाविरोधात तक्रार देण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुरुक्षेत्र येथील महिला पोलीस निरीक्षक शीलावती यांनी दिली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यासंबंधीचा अहवाल येणे बाकी आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

पीडित नवविवाहिनेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्यावर 13 आणि 14 सप्टेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. लग्नाच्या पहिली रात्री म्हणजे 13 सप्टेंबरला ही पीडित महिला तिच्या पतीसोबत एका खोलीत गेली. काही वेळाने तिचा सासरा आणि दिरही तिथे आले. त्यांनी तिला सरबत प्यायला दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 तारखेला सकाळी आपल्यावर बलात्कार केल्याचे या महिलेला समजले. ज्यानंतर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची सासूने आणि नणंदेने तिला मारहाण केली आणि एका खोलीत कोंडून ठेवले. त्या रात्री पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.

या प्रकारानंतर तिच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी वेडयासारखे वागत असून तिला घेवून जा, असे सांगितले. पीडितेचे वडिल घरी पोहचल्यानंतर हा सर्व प्रकार तिने वडिलांना सांगितला. त्यानंतर तिने आणि तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात आणि मांत्रिकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button