breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नववर्षाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – अजित पवार

नागपूर | महाईन्यूज

नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा केले आहे. तसेच, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन असेही अजित पवार यांनी म्हटलेले आहे. आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून लवकरच नववर्षाच्या आधी होईल, असे सांगितले. यावेळी अजित पवार यांना नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून तुमची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला असता यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणास नकार दिला. मात्र, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याबद्दल सुद्धा कोणतीही दिली नाही.

याशिवाय, शेतकरी कर्जमाफीची आज घोषणा होणार नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘आज काहीही होऊ शकते व शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार की नाही, हे मला माहीत नाहीये पण माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांबाबत ते सकारात्मक निर्णय घेऊ शकतात.’ त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे संकेत दिसत आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button