breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्र

गोल्डनमॅन सनी वाघचौरे याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी/महाईन्यूज

पत्नीचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा गोल्डनमॅन म्हणून ओळख असलेल्या सनी वाघचौरे याच्यासह कुटुंबातील चारजणांवर गुन्हा दाखल झालेला आहे.

हा प्रकार २३ मार्च २०११ ते २२ ऑक्टोंबर २०२० दरम्यान संतोषी माता मंदीर चौक, नेहरूनगर येथे घडला. गोल्डनमॅन सनी नाना वाघचौरे (वय ३१), सासू आशा नाना वाघचौरे (वय ५६), नाना वाघचौरे (वय ६०), नणंद निता गायकवाड (वय ३६, सर्व रा . संतोषीमाता मंदीरचौक, मंदीरमागे, नेहरुनगर, पिंपरी पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमैन सनी वाघचौरे आणि सासरच्या लोकांनी संगणमत करुन पीडितेच्या आईवडीलांकडे गृहोपयोगी वस्तुंची मागणी केलेली आहे. पती सनीचे बाहेरील स्त्रियांशी संबध आहेत. याचा जाब विचारला असता त्याने पत्नीस मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यांना गर्भपाताची औषधे देवुन गर्भपात घडवून आणला. यासाठी पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ केला, असे आरोप पीडितेने तक्रारी अर्जात केले आहेत. अधिक तपास चिंचवड पोलिस करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button