breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर डान्स करण्यास बंदी…

रत्नागिरी | महाईन्यूज |

रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर डान्स करण्यास बंदीचा निर्णय जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. जिल्ह्यातल्या 2500 शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास 40 हजार विद्यार्थी सध्या शिकत आहेत. तर, सात हजार शिक्षक काम करत आहेत. चार दिवसांपूर्वी रोहन बने देवरुख तालुक्यातील कोसुंब या गावी जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गेले होते. त्यावेळी कार्यक्रमादरम्यान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयटम साँगवर डान्स केला. यानंतर तडक रोहन बने यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आयटम साँगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसं परिपत्रक देखील त्यांनी जारी केलं.

दरम्यान, त्यांच्या या निर्णयाची सध्या जिल्ह्यात, राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रोहन बने यांनी महिनाभरात घेतलेल्या निर्णयाचं पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केलं आहे. अशा प्रकारचे निर्णय झालेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पालक आणि शिक्षकांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button