breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘वस्ताद’ शरद पवारांचा वाढदिवस बळीराजाला समर्पित!

वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून कृषी कृतज्ञता कोषासाठी निधी

१२ डिसेंबरला मुंबईतील यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्ठमध्ये कार्यक्रम

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस यावर्षी दुष्काळग्रस्त बळीराजाला समर्पित करण्यात येणार आहे.

खासदार शरद पवार दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा सर्वपक्षीय प्रचंड जनसंपर्क आणि त्यांच्याप्रति असलेले जनतेचे लोकविलक्षण प्रेम व आस्था पाहता तसेच सर्वांची पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभीष्टचिंतन करण्याची इच्छा लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

सर्वपक्षीय कार्यकर्ते व अनुयायी, पदाधिकारी आणि सन्माननीय नेत्यांनी दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील मुख्य सभागृहात एकत्रित यावे. याठिकाणी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छांचा पवार त्यांचा स्वीकार करतील, असे कळवण्यात आले आहे.

****

‘कृषी कृतज्ञता कोषा’साठी योगदान…

कृपया साहेबांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी गर्दी करू नये.
साहेबांचा वाढदिवस अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त बळीराजाला समर्पित करण्याचे ठरले आहे. त्यामुळे शुभेच्छुकांनी साहेबांच्या सन्मानार्थ सोबत पुष्पगुच्छ किंवा हार आणणे टाळावे. त्याऐवजी स्वयंप्रेरणेने त्या खर्चाच्या निधीचे ‘कृषी कृतज्ञता कोषा’साठी योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button