breaking-newsताज्या घडामोडीपुणे

COVID-19 : पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत

पुणे | पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी ज्या उपाययोजना केल्या, तोच पॅटर्न पुण्यात राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाचारण करण्याबाबत चर्चा झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सौरभ राव, एस. चोक्कलिंगम, विक्रम कुमार, श्रावण हर्डीकर या पुण्यातल्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मुंबईतील कोरोनावर नियंत्रण
मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. वरळी, धारावी यासारख्या भागात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक करण्यात आलं आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी माहिती चार दिवसापूर्वी दिली होती. तसेच “मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा 50 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही 70 टक्के आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button