breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नक्षलवाद्यांचे तळ उद्धवस्त करत १२ नक्षलींना पकडण्यात यश

छत्तीसगड | महाईन्यूज

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर येथे जवानांनी नक्षलवाद्यांचे तळ उद्धवस्त करत, १२ नक्षलवाद्यांना ताब्यात घेतलेले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत डीआरजीचा एक जवान जखमी झालेला आहे. तर, घटनास्थळावरून जवानांनी स्फोटकांसह शस्त्र आणि नक्षली चळवळीशी निगडीत काही सामान देखील जप्त केलेलं आहे.

पोलीसांना किलेपाल आणि मुंडानार गावानजीकच्या जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती मिळालेली होती. यानुसार या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डीआरजीच्या जवानांनी कटेकल्याण आणि पखनार गावाच्या मध्यात असलेल्या जंगलातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणास घेरले होते.

जवानांच्या कारवाईची चाहुल लागताच नक्षलवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. ज्याला जवानांकडून सडेतोड प्रतित्युत्तर देण्यता आले. साधारण अर्धातास चाललेल्या चकमकीनंतर जवानांनी १२ नक्षलवाद्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button