breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदुरबारमध्ये करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

नंदुरबार | नंदुरबार शहरातील एकास करोना आजाराची लक्षणे दिसून आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गुरुवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री आठ वाजता प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरलं आहे. जिल्ह्यातील करोनाचा हा पहिलाच रुग्ण आहे. नंदुरबारमध्ये आढळलेला करोनाबाधीत रुग्ण मालेगावशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा प्रशासनाने संबंधित रुग्ण वास्तव्याला असलेला संपूर्ण परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button