मनोरंजन

नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावले

‘मराठी बिग बॉस’च्या घरातला सध्याचा आठवडा ‘हुकूमशाही’ स्वरुपाचा आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेला स्पर्धक नंदकिशोर चौगुलेने चक्क मेघा धाडेला बुटावर नाक घासायला लावलं. महिलांविषयी नंदकिशोरच्या वर्तनामुळे प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही आपल्याला शरम वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बिग बॉस संपल्यानंतर म्हणजे ठीक रात्री 11 वाजता करण्यात आलं आहे. त्यामुळे मांजरेकरांनी नंदकिशोरच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Mahesh Manjrekar

@manjrekarmahesh

I am ashamed today!😡😡😡😡😡😡

बिग बॉसने नंदकिशोरला बहाल केलेल्या हुकूमशाहाच्या पदामुळे त्याला विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. मंगळवारच्या भागात बिग बॉसने ‘हुकूमशाह’ हे साप्ताहिक कार्य स्पर्धकांना दिलं आहे. यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आहे, तर इतर सर्व स्पर्धक त्याची जनता आहेत. हुकूमशाह देईल तो आदेश मान्य करणं जनतेला क्रमप्राप्त आहे.

हुकूमशाहासाठी जनतेने ‘नंदकिशोर सर्व शक्तिमान, तुमच्यासमोर झुकवतो मान’ हा जयघोषही तयार केला आहे. सर्व स्पर्धकांना गुडघे टेकून त्याच्यासमोर बसावं लागतं, आणि त्याच्या आदेशाचं पालन करावं लागतं. नंदकिशोरने आस्ताद काळेला आपला रक्षक नेमला आहे, तर स्मिता गोंदकरसुद्धा त्याची सेविका आहे.

हुकूमशाहाच्या नाड्या हातात येताच नंदकिशोरने अनेक फर्मान सोडले. खरं तर टास्क सुरु होण्यापूर्वीच नंदकिशोरने कॅमेरासमोर आगपाखड केली होती. सई लाडावलेली असून घरात राहण्यास अपात्र आहे, मेघाने सात लाख रुपयांचे कपडे खरेदी केले, पुष्करला बाहेर माठ अॅक्टर म्हटलं जातं, असे आरोप त्याने केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button