breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महानिर्मितीच्या जागांवर ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प

  • मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई |

महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. उस्मानाबाद, लातूरसह महानिर्मितीच्या विविध औष्णिक वीजप्रकल्पांच्या रिकाम्या जागेवर एकू ण१८७ मेगावॉट क्षमतेचे तर विदर्भातील विविध ठिकाणी एकू ण ३९० मेगावॉट क्षमतेचे असे एकू ण ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महानिर्मितीच्या औष्णिक वीजप्रकल्पांत बरीच रिकामी जागा असते. या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याबाबत चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला होता. त्यानुसार उस्मानाबादमधील मौजे कौडगाव येथे ५० मेगावॉट क्षमतेचा, लातूरमधील मौजे सिंदाला (लोहारा) येथे ६० मेगावॉटचा, तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे २० मेगावॉट, परळी येथे १२ मेगावॉट, कोराडी येथे १२ मेगावॉट व नाशिक ८ मेगावॉट असे एकूण ५२ मेगावॉट क्षमतेचे आणि धुळे जिल्ह्य़ातील साक्री येथील मौजे शिवाजीनगर येथे २५ मेगावॉट क्षमतेचे असे एकूण १८७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या १८७ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी मेसर्स. केएफडब्लू-बँक जर्मनी यांनी साक्री १५० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी केलेला प्रकल्प अर्थसहाय्य करार वाढवून २०११ मधील शिल्लक प्रकल्प निधीमधून (अंदाजे ७२.८१ दशलक्ष  युरो) या प्रकल्पांना ५८८ कोटी २१ लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम केएफडब्लू – बँक जर्मनीकडून घेण्यासही मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पांकरिता राज्य शासनाच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प महानिर्मिती कंपनी मार्फत इंजिनीयरिग प्रोक्युरमेंट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. या १८७ मेगावॉटच्या प्रकल्पांकरिता भाग भांडवल स्वरूपात सुमारे १५८ कोटी २९ लाख रुपयांचा निधी महानिर्मितीच्या अंतर्गत स्रोतांमधून अथवा वित्तीय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यास मान्यता देण्यात आली. केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल. वाशिम जिल्ह्य़ातील दुधखेडा, परडी ता. कमोर, कंझारा येथे अनुक्रमे ६० मेगावॉट, ३० मेगावॉट व ४० मेगावॉट असे एकूण १३० मेगावॉट क्षमतेचे तसेच  वाशिम-१ प्रकल्पांतर्गत मौजे बाभूळगांव व मौजे सायखेडा येथे प्रत्येकी २० मेगावॉट असे एकूण ४० मेगावॉट क्षमतेचे तसेच वाशिम-२ प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्य़ात मौजे कचराळा येथे १४५ मेगावॉट क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मौजे मंगलादेवी, मौजे पिंपरी इजारा व मौजे मालखेड येथे प्रत्येकी २५ मेगावॉटचे ३ असे एकूण ७५ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित ३९० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांकरीता स्व-भागभांडवलवगळता १५६४ कोटी २२ लाख रुपये खर्चासाठी केएफडब्लूबँक, जर्मनी यांच्याकडून ०.०५ टक्के प्रतिवर्ष या दराने कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

  • शेतीपंपाच्या वीज जोडण्या कापण्यास विरोध

वीज कंपन्यांची थकबाकी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, थकबाकीदार शेतीपंपाच्या वीज जोडण्या कापण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध दर्शविण्यात आला.  वीज कंपन्यांची आर्थिक अवस्था वाईट आहे. यातूनच महावितरण कंपनीने थकबाकीदारांच्या वीज जोडण्या कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतच शेतीपंपाच्या वीज जोडण्या काही ठिकाणी कापण्यात आल्या. शेतीचा हंगाम सुरू असताना वीज तोडू नये, अशी मागणी मंत्र्यांकडून करण्यात आली. यावर पुढील मंगळवारी वीज कं पन्यांच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन के ले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button