breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

धाेनीला गंभीरचा सल्ला ; धाेनीच्या जागी आता लाेकेश राहुलचा पर्याय

मुंबई | यंदा आयपीएल स्थगितीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे क्रिकेट करिअर धाेक्यात येणार असल्याचे संकेत टीम इंडियाच्या माजी खेळाडू गाैतम गंभीरने दिले. आयपीएल यंदा न झाल्यास धोनीला संघात पुनरागमन करणे कठीण होईल. जुलै महिन्यात वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दीर्घ विश्रांतीमुळे इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर धोनीला परत येणे कठीण होत आहे, असे यापूर्वीच गावसकर आणि कपिलदेवने करताना स्पष्ट केले.

‘लाॅकडाऊनमुळे सध्या काेणत्याही स्पर्धा प्रत्यक्षात मैदानावर खेळणे कठीण झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये यंदाची आयपीएल हाेणे अवघड आहे. त्यामुळे धाेनीच्या विश्वचषकासाठी संघातील निवडीबाबत अनेक प्रश्न निर्माण हाेतील. काेणत्या अाधारावर निवड समिती त्याची संघात निवड करेल, असाही प्रश्न आहे. त्यामुळे त्याला आपल्याला सिद्ध करण्याची आता काेणत्याही प्रकारची संधी उपलब्ध नाही.’ असे गंभीर म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button