breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धारावीतही नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस; चिंताजनक परिस्थिती

राज्यात अनलॉकच्या माध्यमातून अनेक नियमांत शिथिलता देताच रुग्णसंख्येतही प्रचंड वाढ होताना दिसत आहे. धारावीतही नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या पाच दिवसात धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. त्यामुळे धारावीकरांची पाचावर धारण बसली आहे.

धारावीत आज दिवसभरात २३ रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णसंख्या २ हजार ९३८ झाली आहे. धारावीत एकूण २ हजार ५१२ जण करोनामुक्त झाले असून आता फक्त १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यापासून धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात पालिका प्रशासनाला यश आले होते. धारावीत रोज दहाच्या आतच रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या पाच दिवसात धारावीतील रुग्णसंख्येने दहाचा आकडा ओलांडला आहे. काल धारावीतल १४ रुग्ण सापडले होते. तर १२ सप्टेंबर रोजी १८, ११ सप्टेंबर रोजी ३३ आणि १० सप्टेंबर रोजी धारावीत ११ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णाचा आकडा वाढत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे राज्यातील व्यवहार मोठ्याप्रमाणावर सुरू झाले आहेत. मात्र, नागरिकांकडून करोना रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी घेतली जात नाही. लोक सर्रासपणे फिरत असून मास्कही वापरताना दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जात नाही. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button