breaking-newsपिंपरी / चिंचवड

धन्वंतरी योजना रद्दचा निर्णय मागे घ्या, आमदार बनसोडे यांची आयुक्तांना सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना कायम ठेवण्यात यावी. जोपर्यंत कोविड 19 परिस्थिती अटोक्यात येत नाही. तोपर्यंत विमा पॉलिसीबाबत विचार करण्यात येऊ नये, अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

सध्याची परिस्थिती कोविड प्रादुर्भावाची असल्यामुळे विमा पॉलिसीवर विनाकारन खर्च करणे उचीत ठरणार नाही. विमा पॉलिसीमध्ये कर्मचा-यांसाठीच्या काही अजारांचा समावेश नसल्याची तक्रार कर्मचा-यांनी केली आहे. त्यामुळे विमा पॉलिसीचा निर्णय कर्मचा-यांच्या इच्छेविरोधात जात आहे. तरी, त्वरीत हा निर्णय मागे घेण्यात यावा. कर्मचा-यांसाठी धन्वंतरी योजना कायम सुरू ठेवावी, अशी सूचना आमदार बनसोडे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button