breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी आघाडीचा धर्म पाळला, एकमेव शिवसेना नगरसेवकाला सभापती पद बहाल

परळी – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापतीपद दिले. त्यामुळे बीडच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरत आहे. परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली, या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले.

वाचा :-काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव

परळी नगर परिषदेत एकूण 32 निवडून आलेले आणि 3 स्वीकृत असे एकूण 35 नगरसेवक आहेत. यांपैकी जवळपास 30 नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला आणि बालविकास सभापतीपद

विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीत शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला आणि बालविकास सभापतीपद देण्यात आले. याशिवाय अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती या सर्व सभापती पदांसह स्थायी समितीवर बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान आणि रेश्मा बळवंत यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्यात. यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button