breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! हातावर वार करत मनगट घेऊन आरोपी फरार

लातूर | महाईन्यूज

लातूर जिल्ह्यात हिंस्रपणाची खळबळजनक घटना घडली आहे. जळकोट तालुक्यात एका आरोपीने तरुणाचा हात मनगटापासून तोडून, तो आपल्यासोबत घेऊन पळून गेलेला आहे. चेरा या गावात ही थरारक घटना घडली आहे. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेची परिसरात एकच चर्चा सुरु आहे. जखमी व्यक्तीचा हात आणि आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाहीये. प्रकाश माने असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर पिराजी पिकले या आरोपीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे.

चेरा पाटी गावाजवळच्या धाब्यावर जेवण करुन प्रकाश माने घराकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या पिराजी पिकलेने तीक्ष्ण हत्याराने प्रकाश मानेवर हल्ला केला होता. पिराजीने प्रकाशच्या हातावर सपासप वार केले. त्याने हात मनगटापासून कापून काढला. हात सहजा सहजी तुटत नसल्याने आरोपीने प्रकाशच्या हातावर सपा-सप वार केले व त्यानंतर मनगटापासून तुटलेला हात घेऊन आरोपी पिराजी गाव सोडून पळून गेला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावरील उपचारानंतर पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेला चार दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप ना आरोपी सापडला, ना मनगटापासून तुटलेला हात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button