breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तुम्ही देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. त्यानंतर, आता मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका सोनाली कुलकर्णीनेही जेएनयुतील हल्ल्याचा निषेध नोंदवत सरकारवर निशाणा साधला.

”तुम्ही देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाहीत, अन् दुसऱ्या देशातील अल्पसंख्यांना सुरक्षा देण्याच्या गोष्टी करता” असे ट्विट सोनालीने केले आहे. आपल्या ट्विटमधून सोनालीने जेएनयुवरील हल्ल्याचा एकप्रकारे निषेध करताना, सीएए कायद्यावरही टीका केली आहे. अभिनेत्री सोनालीनेही स्पष्ट भूमिका घेत जेएनयुतील हल्ल्यावरुन सरकारला लक्ष्य केलं.

जेएनयुवरील हल्ल्याचा संदर्भ देत नटरंगफेम सोनाली कुलकर्णीने केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने नुकताच नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत पारित केला आहे. त्यानुसार, इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देण्यात येणार आहे, सोनालीने हाच मुद्दा उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button